पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन


पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन


सफाई कर्मचारी ला नौकरी वरून बंद करण्याची धमकी देणारे सहाय्यक आयुक्त ला तात्काळ कार्यवाही करा


 सफाई कर्मचाऱ्यांचा होत आहे शोषण


सफाई कर्मचारी चे बाबूपेठ हजेरी झोन बदलविले



सुरक्षा किट न देता करवून घेत आहे कोणतेही काम


 भारतीय सुदर्शन समाज महासंघाचा तर्फे तीव्र निषेध


चंद्रपूर:- 


कोरोना महामारी चे वायरस देशभरात अत्यंत जलद गतीने वाढत असल्याने त्या वर आपल्या जिवाची पर्वा न करता सफाई कर्मचारी हे आपले जिव धोक्यात घालून चंद्रपूर जिल्हयाला कोरोना पासून मुक्त करण्यासाठी सतत परिश्रम घेत आहे. परंतु सफाई कर्मचारी ला नौकरी वरून बंद करण्याची धमकी देणारे सहाय्यक आयुक्त हे मानसिक प्रताडणा करत असल्याणे तात्काळ यांच्या वर कारवाही करावी अशी निवेदन  भारतीय सुदर्शन समाज महासंघचे पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार याना दिली आहे. सफाई कर्मचारी समन्वय समिती सदस्य व भारतीय सुदर्शन समाज महासंघचे पदाधिकारी हे महानगरपालिका च्या अधिकारी शी समन्वय साधून सहाय्यक आयुक्त सचिन पाटील यांना बाबूपेठ झोन स्थानांतरित का करत आहे विचारले असता माझा पावर तुम्हाला माहीत नाही मला जे करायचं ते करिन असे उत्तर दिले व महिला सफाई कर्मचारी ला अप शब्दात बोलले सहाय्यक आयुक्त यांचे हे कृत्य कदापि खपून घेणारे नसून अश्या अरेरावी अधिकारी वर कार्यवाही करा अशी मागणी भारतीय सुदर्शन समाज महासंघाने केली आहे .
महानगरपालिका चंद्रपूर यानी सफाई कर्मचारी ना सुरक्षा किट न देता त्यांच्या करून सफाई व्यतिरिक्त इतर ही कामे करून घेत आहे. व जोरजबरीने महानगरपालिका चे अधिकारी सहाय्यक आयुक्त सचिन पाटील हे त्यांना निलंबणाची व कामा वरून घरी बसवण्याची धमकी देत आहे अशी तक्रार भारतीय सुदर्शन समाज महासंघा ने चंद्रपूर चे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडे  केली आहे.
त्यासोबतच चंद्रपूर चे आमदार किशोरभाऊ जोरगेवार, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी ही निवेदन दिले आहे.
भारतीय सुदर्शन समाज महासंघ चे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मनोजबाबू खोटे व संघटन मंत्री राजेश रेवते राकेश खोटे सचिन नंहेट उमेश नंहेट कमलेश राठोड ,  विक्रम उसरे यानी महानगरपालिका चे सायय्यक आयुक्त सचिन पाटील यांना झोन का बदवले व अन्य विषयावर तोडगा काढण्यास विनंती केली असता अरे राही उत्तर दिले. उपायुक्त विशाल वाघ यांनी  लवकरच  तोडगा काढण्याचा आश्वासन दिले होते परंतु सफाई कर्मचाऱ्यांचे सारखे प्रताडणा सुरूच आहे ही गंभीर बाब असून भारतीय सुदर्शन समाज हे कदापि सहन करणार नाही या संदर्भात पालकमंत्री याना नियोजन भवन मध्ये भेट घेऊन निवेदन देऊन  महानगरपालिका प्रशासनाची तक्रार केली आहे.
सफाई कर्मचारी यांची कोरोना ला मात करण्यासाठी विविध ठिकाणी अतिरिक्त कामावर लावण्यात आले असून आपण सांगा ते काम आम्ही करू पण आम्हि माणूस आहो आम्हाला जीव आहे मुलबाळ आहे परिवार आहे आमच्या सुरक्षेचा कस काय?,आम्हाला चंद्रपुर जिल्यात कोरोना पाजीटीव असलेले रुग्णांच्या घरच्यांना व संपर्कातील लोकांना कोरोनटाईन केले तिथे कामावर बिना सुरक्षा किट न देता कामावर पाठवले, सफाई कामगाराना सुरक्षा किट देण्यात येत नाही, व  बिमा हि करण्यात आलेले नाही.तसेच  सतत दोन महिने पासून बारा-बारा तास कामे करवून घेत आहेत.  कोरोनटाईन येथे असलेल्या संशयित रुग्णांना जेवण वाढणे, बेडशीट धुण्यासाठी सांगतात बेडशीट धुण्याचे काम रुग्णालयातील कर्मचारी चे आहे महानगरपालिका चे सफाई कर्मचारी चे नाही , आम्हाला महानगरपालिका व्यतिरिक्त बाहेर तालुका ठिकाणी सुरक्षा किट न देता कोरोना संशयित मृत्यू लोकांचे शव उचलण्यासाठीही पाठवत आहे. आमचे काम आठ तास असून आमच्याकडुन 12 तास काम करून घेत आहे आणि  महानगरपालिका क्षेत्रा बाहेरही(कामे) डीवटी लावण्यात आलेली आहे. काम न ऐकल्यास संबंधित अधिकारी उपायुक्त आणि साहाय्यक आयुक हे  धमकी देऊन काम करून घेत आहे अशी तक्रार भारतीय सुदर्शन समाज महासंघ नी केली आहे.तसेच सफाई कर्मचारी चे हजेरी झोन बाबूपेठ होते त्याला साहाय्यक आयुक्तांनी कोणतीही सूचना न देता विना कारण बाबूपेठ वरून हलवुन बंगाली केम्प स्थानांतरित केले सफाई कर्मचारी चा झोन स्थानांतरित केल्याने सफाई कर्मचारी ना नाहक त्रास होत आहे.
काही सफाई कर्मचारी चे सतत काम करू करू प्रकुर्ती बिघडत असून ते सुट्टी साठी अर्ज केले असता त्यांची सुट्टी मंजूर करत नसून त्यांना या अधिकारी कडे त्या अधिकारी कडे जा म्हणून टाळाटाळ करत आहे.भारतीय सुदर्शन समाज महासंघ चे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मनोजबाबू खोटे व संघटन मंत्री राजेश रेवते या सफाई कामगारावर होणारया अन्यायच्या तीव्र निषेध करत आहे व मानवतेचा दृष्टिकोणातून विचार करून व संबंधित अधिकारी वर  त्वरीत कारवाई करावी व सफाई कर्मचारी चे जे काम आहे तेच कामे त्यांच्या कडून करून घ्यावे अतिरिक्त कामे करवुन घेतल्यास त्याचा मोबदला द्यावा आणि सफाई कर्मचाऱ्यांना मानसिक प्रताडीत करणारे अधिकाऱ्यांन वर कारवाही करावी अशी मागणी केली आहे.


 


महाराष्ट्र स्वाददाता किशोरी कांत चौधरी की रिपोर्ट