माजरी पोलीस स्टेशनतुंन तोडफोड करून पोलिसांना धमकी देऊन फरार झालेला आरोपी भद्रावती वरून अटक


 


माजरी पोलीस स्टेशनतुंन तोडफोड करून पोलिसांना धमकी देऊन फरार झालेला आरोपी भद्रावती वरून अटक


माजरी :- 


माजरी पोलीस स्टेशन हद्दीतील माजरी पाटाळा रोडवर रणजित कंपनी जवळ एका आरोपीला वणी वरून देशी दारू आणताना माजरी पोलीसांनी पकडले सदर आरोपी माजरी पोलीस स्टेशन मध्ये हंगामा करून लाकडी लांब बेंच ची पट्टी तोडून पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केली पोलिसांना धमकी देऊन पडून गेला त्या आरोपीला भद्रावती वरून आज अटक करण्यात आली त्या आरोपीला भद्रावती वरून आज अटक करण्यात आली असून सदर आरोपीला भद्रावती न्यायालयात हाजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी (पीसीआर)दिली आहे.
माजरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांनी दिलेल्या माहिती नुसार  माजरी पाटाळा रोडवर रणजित कंपनी जवळ आरोपीला मनोज गौतम पिपरे वय 31 वर्षे  पंचशील नगर भद्रावती  राहणारा वणी वरून हिरोहोंडा दुचाकी वाहनाने पन्नास बाटली देशी दारू आणताना माजरी पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलीस विजय चिकणकर  यांनी अटक केली दुचाकी वाहनाने MH 34 BS 5519 सह पंचावन्न हजार चा मुद्देमाल जप्त केला परंतु सदर आरोपी ने दुपारी 3-30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये दोन पोलीस व एक महिला पोलीस असल्याचा संधी चा फायदा उचलून गोंधळ करणे सुरू केले व पोलीस स्टेशन मधील लांब बसण्याचा बेंच चे लाकडी पट्टी तोडून टेबल वर चे काच संगणक व इतर वस्तू तोडफोड केली आणि पोलिसांना धमकी देऊन  दुचाकी घेऊन फरार झाला. 
आरोपी फरार झाल्यापासून माजरी पोलीस सतत भद्रावती मध्ये आरोपीचे शोध मोहीम सुरू होते आज पहाटे आरोपी मनोज पिपरे ला भद्रावती वरून अटक करण्यात आली. आरोपी फरार झाल्यामुळे माजरी पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली होती आता आरोपी मिळाल्याने माजरी पोलिसांनी बर वाटू लागले आहे.सदर घटनेची तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजितसिंग देवरे, विजय चिकणकार करत आहे.


तीन दिवस पीसीआर
आज फरार आरोपी मनोज पिपरे ला अटक  करण्यात आली त्या आरोपीला भद्रावती वरून आज अटक करण्यात आली असून सदर आरोपीला भद्रावती न्यायालयात हाजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी (पीसीआर) दिली आहे. ..............            


 किशोरी कांत चौधरी..........संबाददाता महाराष्ट्र